Thursday, 5 December 2013

हं … बरेच दिवस झाले काही लिहिलेच नाही .... ओळख होईल म्हणता म्हणता सुरुवातच झाली नाही. जवळ जवळ दीड वर्षाने मग आज घेतले काहीतरी लिहायला ....... पण काय लिहू कुठून सुरुवात करू....
आज  काही खास आहे असे नाही पण वाहत्या नदीला कितीही बंधारे घातले तरी ती अडून थोडीच न राहणार  कधी न कधी तिचा प्रवाह परत चालू होणारच ना…

मन  माझे चिड़ाते माझ्यावर 
"अशी नव्हतीस तू 
अशी  नव्हतीसच तू 
होतीस निखळ झ-या सारखी 
होतीस अवखळ वा-यासारखी 
होतीस निष्पाप मुलासारखी 
होतीस  प्रफुल्लित फुलासारखी 
अल्लड युवतीही होतीस
आणि होतीस हळवी सखीही .... 
खरच ! अश्शीच होते मी 
पण ; आता हरवलय सार 
कारण , मी फ़क्त माझी नाही 
हयाची जाण आले मला …………

Wednesday, 28 March 2012

थोडीशी ओळख .....

थोडीशी ओळख .....
हं........ लिहिताना लिहिले आहे कि थोडीशी ओळख म्हणून....... पण होता होता आपली बरीच ओळख होवून जाईलच म्हणा.
मी.... मग्रूरतेचा नाही. मी... प्रेमाचा, मनातल्या ओलाव्याचा, हरवून गेलेल्या मुग्धतेचा. मी ममतेचा, मी खट्याळपणाचा, मी रोजच्या रहाटगाडग्यात दडपून गेलेला.....मी जो प्रत्येकात आहे. मी जो सगळ्यांना हवा आहे. मी तुझ्यातला आणि मी माझ्यातला....